महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात 59.5 टक्के मतदान - पालघर विधानसभा निवडणूक न्यूज 2019

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण  2 हजार 193 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यापैकी  ग्रामीण भागात 1 हजार 160 मतदान केंद्रे आहे. शहरी भागात 1 हजार 33 मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 14 हजार 114 अधिकारी-कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ अशा 6 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

पालघर जिल्ह्यात 59.5 टक्के मतदान

By

Published : Oct 22, 2019, 7:54 AM IST

पालघर- जिल्ह्यात सर्व 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 59.5 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू विधानसभा मतदारसंघात 60.63 टक्के, विक्रमगड 69 टक्के, पालघर 44.09 टक्के, बोईसर 67 टक्के, नालासोपारा 51.47 टक्के आणि वसई- 64 टक्के इतके मतदान झाले आहे.

पालघर जिल्ह्यात 59.5 टक्के मतदान

हेही वाचा - पालघरमध्ये 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कार; वाढवण बंदराला विरोध

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण 2 हजार 193 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यापैकी ग्रामीण भागात 1 हजार 160 मतदान केंद्रे असून शहरी भागांत 1 हजार 33 मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 14 हजार 114 अधिकारी-कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ अशा 6 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा - पालघरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, तंत्रज्ञ आणि एकूणच सर्व यंत्रणांचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details