महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माऊली संवाद यात्रा : पालघरमधील महिलांनी बांदेकरांसमोर वाचला समस्यांचा पाढा - Shivsena Secretary aadesh Bandekar

विक्रमगड तालुक्यातील महिलांनी कडी-कुर्झे गावातील मंदिर आणि स्मशानभूमी संदर्भातील समस्या बांदेकर यांच्या समोर मांडल्या.

आदेश बांदेकर

By

Published : Aug 2, 2019, 9:25 PM IST

पालघर (वाडा) -शिवसेनेकडून आज (शुक्रवारी) जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी माऊली संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यासमोर विक्रमगड तालुक्यातील महिलांनी येथील समस्यांचा पाढा वाचून दाखवला.

माऊली संवाद यात्रेत बोलताना आदेश बांदेकर

माऊली संवाद कार्यक्रम हा दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. कार्यक्रमात विक्रमगड तालुक्यातील महिलांनी कडी-कुर्झे गावातील मंदिर आणि स्मशानभूमी संदर्भातील समस्या बांदेकर यांच्या समोर मांडल्या. त्यानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही समस्या दिवाळी अगोदर सोडवण्यात येईल, असे आश्वासन या महिलांना दिले. या मतदारसंघातील शिवसेनेत ३५ वर्ष काम करणाऱ्या एका महिला कार्यकर्तीने विक्रमगडमधील रस्ते, वीज आणि इतर अनेक समस्यांबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्या ऐकणात म्हणून माईकचा ताबा बांदेकरांनी घेऊन शेवटी त्यांना ओरडून गप्प बसा, असे सांगितले.

यावेळी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, महिला आघाडी प्रमुख वैष्णवी रहाणे, तालुका प्रमुख सागर आळसी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी बांदेकरांनी होम मिनीस्टर कार्यक्रमासारखेच जमलेल्या महिलांना बोलते केले. त्यांना जाणवणारे प्रश्न मांडायला लावले.

ABOUT THE AUTHOR

...view details