पालघर - ६० वर्षाचे असहाय्य वडील आपल्या २३ वर्षाच्या मुलीला घेऊन जाण्यासाठी थेट हावडाहून वसईत आले. पण, मुलगी कुंटनखान्यात अडकली होती. पोलिसांनी तिची महिला सुधारगृहात रवानगी केली. अशात, मुलीला घेण्यासाठी आलेल्या वडिलाला अनोळखी प्रदेश व भाषेची अडचण आल्याने त्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून आले व पीडित मुलीला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
वसईतील शिवसैनिकांकडून अनोखी भाऊबीज भेट
कोलकात्यातील मुर्शिदाबाद येथे राहणारा (वय 60) विटभट्टी कामगार हा आपली पत्नी, २३ वर्षाची मोठी मुलगी व १६ व १४ वर्षांच्या दोन मुलांसह राहतो. अठरा विश्व दारिद्र्यात असलेल्या या परिवारातील मोठ्या मुलीला तीन महिन्यापूर्वी ओळखीच्या एका व्यक्तिने कोलकत्याला चांगल्या पगाराची नोकरी, राहायला जागा व जेवणाची सोय करतो, असे सांगून थेट मुंबईला आणले. तेथून तिला नालासोपाऱ्यात देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले. तुळींज पोलिसांनी विरार गोकुळ टाऊनशीप येथे एका प्रकरणात तिला देहविक्री करताना पकडले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने तिला बोईसर येथील रेस्क्यू फाऊंडेशनच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. वसई न्यायालयाच्या अॅड. शारदा पाटील यांनी सदर पीडित महिलेच्या वडिलांना मुर्शीदाबाद येथे संपर्क साधून त्यांना मूंबईत येण्यास सांगितले. त्यानंतर वसई न्यायालयात मुलीच्या वडिलांनी शारदा पाटील यांची भेट घेतली असता, आपल्या मुलीला कुंटनखान्यात देहविक्री करायला लावल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. न्यायलयाबाहेर रडत बसलेल्या असहाय्य बापाला समोरच असलेल्या 'शिवालय' या शिवसेना शाखेतील माजी नगरसेवक प्रवीण कांबळी व शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांनी पाहिल्यावर त्यांनी चौकशी केली. त्यानंतर या दोघांनी धावपळ करत न्यायालयातून अॅड. शारदा पाटील यांच्यामार्फत महिला सुधारगृहातून पीडित महिलेच्या सुटकेसाठी आदेश काढला.
हेही वाचा -चिकन नको रे बाबा.. मटण प्लेट लाव.. बर्ड फ्ल्यूमुळे चिकन विक्रेते, सावजी भोजनालयांना फटका