विरार :वज्रेश्वरी रोड वरील उसागव येथे पाण्याच्या ड्रममध्ये कपड्याने बांधून ठेवलेला मृतदेह सापडला असल्याची घटना ताजी असताना रविवारी विरार , मारंबळपाडा जेटीकिनारी एक अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Virar Crime : महिलेचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत - विरार पोलीस स्टेशन
विरार पश्चिमेकडील मारंबळपाडा गावाजवळ असलेल्या जेटीजवळ एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या महिलेच्या शरीराला दगड बांधलेला होता.
विरार पश्चिमेकडील मारंबळपाडा गावाजवळ असलेल्या जेटीजवळ एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या महिलेच्या शरीराला दगड बांधलेला होता. अज्ञात व्यक्तींनी तिला गळ्यात दगड बांधून नदीपात्रात ढकलून दिले असावे असा अंदाज बांधला जात आहे. या तरुणीने निळ्या रंगाची पँट घातली होती. तरुणीचा मृतदेह गावामधील स्थानिक नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा -Murder of BJP office bearer : युनियनच्या वादातून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या, सहा तासात संशयित गजाआड