महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्याच पावसात रस्त्यांवर तुंबले पाणी; कार रस्त्याऐवजी गटारात - accident

पालघर परिसरात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले. पावसाच्या पाण्यामुळे शहरातील रस्ते व गटारे सम-समान पातळीवर आली, यातच एका कार चालकाला रस्ता आणि गटार कुठे हेच समजले नाही व त्याची कार ही गटारात जाऊन अडकली.

गटारात अडकलेली कार

By

Published : Jun 28, 2019, 8:38 PM IST

Updated : Jun 28, 2019, 9:01 PM IST

पालघर -सध्या सगळीकडे पावसाचे दमदार आगमन झाले आहे. कुठे नागरिक पावसाने सुखावले तर कुठे अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिक गोंधळून गेले. पालघरमध्ये पडलेल्या पावसात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पहिल्याच पावसात गटारात अडकलेली कार


पालघर परिसरात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले. पावसाच्या पाण्यामुळे पालघर शहरातील रस्ते व गटारे सम-समान पातळीवर आली. याचाच परिमाण की काय एका कार चालकाची फसगत झाली.


जुना पालघर परिसरातील पालघर-बोईसर रस्त्यावर कार चालकाला रस्ता आणि गटार कुठे हेच समजले नाही आणि त्याची कार चक्क गटारात अडकली. यात कोणालाही इजा झाली नाही. काही वेळानंतर नागरिकांच्या मदतीने ही कार गटारातून बाहेर काढण्यात यश आले.

Last Updated : Jun 28, 2019, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details