पालघर- गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. ही घटना मनोर पोलीस ठाणे हद्दीतील बांगरचोळे गावात घडली. याप्रकरणी आरोपी संजय मधुकर तांबडी (वय २२) याच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
बांगरचोळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - Sanjay Madhukar Tambadi arrested
मनोर नजीक बांगरचोळे गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी २१ ऑक्टोबरला सायंकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी संजय मधुकर तांबडी (वय २२) याने तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार केला.
बांगरचोळे गावातील सोळा वर्षीय मुलगी २१ ऑक्टोबरला सायंकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी संजय मधुकर तांबडी (वय २२) याने तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार केला. घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. त्यामुळे, घाबरल्याने तिने घडलेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली नाही. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) घडलेल्या घटनेची माहिती तिने पालकांना दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी मनोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-पालघरमध्ये लाऊड स्पीकर माध्यमातून विद्यार्थी घेत आहे 'शिक्षण'