पालघर -मिरारोड येथील काशिमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल सुरेश कारखिले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पांडुरंग वाडी, काशिमिरा येथे वास्तव्यास होता. हर्षल कालखिरे ( वय.३०) व रायकरवाडी येथे राहणार आरोपी अविनाश बामणे हे दोघे मित्र होते.
पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या - friend kills a friend over a money dispute
मिरारोड येथील काशिमिरा परिसरात राहणाऱ्या तरुणाची त्यांच्या मित्राने पैशाच्या वादातून हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.
![पालघरमध्ये पैशाच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5116693-690-5116693-1574184199728.jpg)
अविनाश हा डेकोरेटर तर हर्षल हा डीजेचे काम करत होता. हे दोघे मित्र होते व ते नेहमी बरोबर असायचे. हर्षल याने अविनाशकडे डीजेचे काम करत होता. त्या कामाचे २७ हजार रुपये बाकी होते. ते बऱ्याच दिवसापासून हर्षल अविनाशकडे मागत होता. मात्र, त्याला अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद चालू होता. त्या वादातून हर्षलने अविनाशचे स्पीकर उचलून नेले होते. पैसे दिले तर स्पीकर परत देणार असे सांगितले. तो वाद १८ नोव्हेंबर रोजी दहिसर येथे झाला. हा वाद दहिसर पोलीस ठाण्यात गेला तेथे दोघांचा वाद मिटवण्यात आला व अविनाश याने पैसे देण्याचे मान्य केले. याचाच राग अविनाशच्या मनात होता. यानंतर ते रात्री पुन्हा एकत्र आले व ते एकत्र दारू प्याले. त्यानंतर रात्री त्यांच्यात भांडण झाले, त्या भांडणात हर्षलचा मृत्यू झाला. नंतर अविनाश व त्याच्या मित्राने नंतर त्याचा मृतदेह डेल्टा गार्डन समोर नेऊन टाकला. सकाळी या परिसरात मृतदेह असल्याचे एकाने बघितले, तेव्हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अविनाश व त्याच्या मित्राला अटक केली आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.