पालघर Goods Train Derailed : जिल्ह्यातील वसई स्टेशनजवळ मालगाडीचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली (Goods Train Derailed Vasai) आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मालगाडीचे काही डबे वसई स्टेशन यार्डजवळ रुळावरुन घसरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झालेला नाही - पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर
घटनेत जीवितहानी नाही : डोंबिवलीकडून मालगाडी वसईकडे येत असताना यार्डाजवळ काही डबे रुळावरुन घसरले आहेत. मालगाडी असल्यामुळं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, रेल्वे मार्ग पूर्वपदावर केला जात आहे.
घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट : डोंबिवलीवरुन ही मालगाडी वसईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी वसई यार्डजवळ ही मालगाडी येताच तिचे काही डबे रुळावरुन घसरले. संबंधित घटना कोणत्या कारणामुळं झाली याची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही. मात्र, घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सप्टेंबर महिन्यातही घडली होती अशीच घटना : पनवेल दिवा रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकातून सुटलेल्या मालगाडीचे सहा डबे नवीन पनवेल येथील पुलावर घसरले होते. नेमकी दुर्घटना कशामुळं झाली याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही. ही मालगाडी लोखंडी कॉईल घेऊन कळंबोली स्थानकात जात होती. यादरम्यान ही घटना घडली होती.
हेही वाचा -
- Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ
- Ahmednagar Burning Train Fire Video : अहमदनगरमध्ये 'द बर्निंग ट्रेनचा थरार'; पाहा धगधगत्या आगीचा व्हिडिओ...