पालघर- शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेल्या एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पालघर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेला एक आरोपी कोरोनाबाधित - Criminal corona positive palghar
पालघर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील उमरोळी येथील आरोपीस पालघर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले व या आरोपीची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पालघर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील उमरोळी येथील आरोपीस पालघर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले व या आरोपीची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या संपर्कात असलेल्या एका पोलीस अधिकार्यासह पोलीस कर्मचार्यांची तपासणी करून त्यांच्या विलगिकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध आरोग्य यंत्रणा करीत आहेत. या आधीच पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या व आरोपीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता पालघर पोलीस ठाण्यात अटक आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.