पालघर- वसईच्या रानगाव येथून कोशापीरा बेटावर समुद्रात बोट घेऊन फिरायला गेलेल्या तरुणांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यात गिरीजच्या स्टिवन कुटिनो (वय 37) तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - वाडा पोलीस ठाण्यात 'रायजिंग डे'चे आयोजन

वसई येथील गिरिज येथे राहणाऱ्या सहा मित्रांचा ग्रुप फिशिंगसाठी साधी बोट आणि एक मशीन बोट अशा दोन बोट घेऊन रानगावहून शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास समुद्रात निघाले होते. समुद्रात फिशिंग करून झाल्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोशापीरा येथून परतत असताना समुद्रातील लाटांच्या तडाख्यामुळे साधी बोट समुद्रात उलटली. या वेळी दुसऱ्या बोटीत असलेल्या मित्रांनी या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला व दोन मित्रांना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र स्टिवन कुटिनो या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आशुतोष या तरुणाच्या पोटात पाणी गेल्याने त्याला उपचारासाठी वसईच्या डी.एम. पेटिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारचा गोंधळात गोंधळ'