पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ९४ कोरोना रुग्ण; २ मृत्यू - Covid19 total positive case
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ९४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळूले असून २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात ९४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळूले असून २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ९४ कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक ६६ रुग्ण पालघर तालुक्यातील असून ८ डहाणू तालुक्यातील, २ तलासरी तालुक्यातील, ७ वाडा तालुक्यातील, १ जव्हार तालुक्यातील व १० वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी एक कोरोना रुग्ण वाडा व एक पालघर तालुक्यातील आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ८०३ इतकी झाली असून, ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८३८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.