पालघर- शासनाने परवानगी घेऊन नागरिकांना प्रवासाची मुभा दिल्याने आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने महाराष्ट्रात परराज्यातील अनेक प्रवासी अडकून पडले. मात्र, आता राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अडकून पडलेल्या प्रवाशांना राज्य सरकारकडून परवानगी घेऊन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात-राज्यस्थानकडे आपल्या घरी परतण्यासाठी नागरिकांच्या वाहनांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा - महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये शिथीलता
ज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने महाराष्ट्रात परराज्यातील अनेक प्रवासी अडकून पडले. मात्र, आता राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अडकून पडलेल्या प्रवाशांना राज्य सरकारकडून परवानगी घेऊन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा
महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील अच्छाड टोलनाका येथे वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढे सोडण्यात येत आहे. यामुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
Last Updated : May 5, 2020, 3:22 PM IST