पालघर - पूर्व नालासोपाऱ्यातील संतोष भुवन येथे ६ वर्षाचा मुलगा उघड्या गटारातून १० किलोमीटर लांब वाहून गेल्याची घटना घडली. शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह ओसवाल नगरी येथे सापडल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.
वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला; नालासोपाऱ्यातील घटना
पूर्व नालासोपाऱ्यातील संतोष भुवन येथे एक ६ वर्षाचा मुलगा उघड्या गटारातून दहा किलोमीटर लांब वाहून गेल्याची घटना घडली. शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह ओसवाल नगरी येथे सापडला आहे.
अबू बकर असे या मृत मुलाचे नाव आहे. पाणी साचल्यामुळे या भागातील गटाराची झाकणे वसई-विरार महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाही तर स्थानिक रहिवास्यांनीच पाणी घरामध्ये जाऊ नये यासाठी खोलली होती. याच वेळी हा मुलगा त्याठिकाणी गेला आणि ही दुर्घटना घडली, अशी माहिती बांधकाम विभागाच्या सहाय्यक आयुक्त दिपाली ठाकूर यांनी दिली. तर अजूनही बरीच गटारीची झाकणे ही निकृष्ट दर्जाची आहेत या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, संबंधित ठेकेदारांना विचारणा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तर गटारी बाबत अधिक विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.