महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाडा तालुक्यात 6 नव्या रुग्णांची नोंद; दोन डॉक्टर अन् पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश - पालघर बातमी

वाडा शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात लोकांचा सध्या शोध सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी सांगितले. 23 जून सायंकाळपर्यंत वसई विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3060 वर पोहोचली होती.

6-new-corona-patient-found-in-wada-palghar
वाडा तालुक्यात 6 नव्या रुग्णांची नोंद

By

Published : Jun 24, 2020, 6:48 PM IST

पालघर- जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोरोनाची वाढ होत आहे. यातच बुधवारी 6 नव्या रुग्णाची वाढ झाली. यात वाडा शहरातील दोन डॉक्टर आणि एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी मोखाडा तालुक्यात 3, डहाणूत 3, वसईत तालुकात 1 प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.

वाडा तालुक्यात 6 नव्या रुग्णांची नोंद

वाडा शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात लोकांचा सध्या शोध सुरू आहे, असे वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी सांगितले. 23 जून सायंकाळपर्यंत वसई विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3060 वर पोहोचली होती. तर वाडा तालुक्यात ही संख्या 151 होती.

वाडा तालुक्यात 25 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. वाडा नगरपंचायत, खानिवली, भावेघर, चांबले, खरिवली, या गावात 5 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. लॉकडाऊमध्ये शिथिलता दिल्याने बहुतांश भागात नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.

तालुकानिकाह तपशिल...

ABOUT THE AUTHOR

...view details