पालघर- शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मृत रुग्ण हा ५० वर्षीय पुरुष असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका वगळता ग्रामीण भागातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समजले आहे.
पालघरमध्ये ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू - suspected corona patient palghar
मृत कोरोनाबाधित व्यक्ती ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये एका कंपनीत कामावर असून लॉकडाऊनदरम्यान दोन दिवसआधी म्हणजे १७ तारखेला आपल्या गावी सफाळे येथे आला होता. प्रकृती खालावल्याने या व्यक्तीस पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळपासून ही व्यक्ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र आज त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मृत कोरोनाबाधित व्यक्ती ज्या परिसरात रहात होता, तो परिसर बंद करण्यात आला आहे. मृतकाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या अधिक नागरिकांचा तपास करण्यात येत आहे. मृत व्यक्ती ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये एका कंपनीत कामावर असून लॉकडाऊनदरम्यान दोन दिवसआधी म्हणजे १७ तारखेला तो आपल्या गावी सफाळे येथे आला होता. प्रकृती खालावल्याने या व्यक्तीस पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळ पासून ही व्यक्ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र आज त्याचा मृत्यू झाला.