पालघर/बोईसर :महावितरण कंपनीच्या नावाने बोईसर येथील एका व्यापाऱ्याला मॅसेज (Mahavitran bill payment message) पाठवत, आपले लाईटबिल भरा अन्यथा आपला वीजपुरवठा आज रात्री खंडित (Mahavitran power disconnection message) करण्यात येईल. या व्यापाऱ्याचे लाईट बिल थकित असल्याने व्यापारी ऑनलाइन ठगाचा जाळ्यात (Mahavitaran Bill Pay Online Fraud) अडकला. त्याला ऑनलाइन पैसे भरण्यासाठी एक ॲप्स डाऊनलोड करायला लावून पन्नास हजार रुपयांच्या चुना (rupees stolen from businessman bank account) लावल्याची घटना बोईसर येथे घडली आहे. latest news from Palghar, palghar news
बिल भरण्यासाठी मोबाईलवर आला मॅसेज-बोईसर ओसवाल येथील एक प्रसिद्ध कपड्याच्या व्यापाऱ्याला महावितरणच्या मॅसेज पाठवत थकलेले लाईट बिल भरा; अन्यथा रात्री १०:३० आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा मॅसेज ७५३००१५१०१ ह्या मोबाईल क्रमांकावरून दिनांक १२ नोव्हेंबर २२ रोजी दुपारी ४ वाजून ०२ मिनिटांनी ग्राहकाच्या मोबाईल वर पाठवला. बिलबाबत अधिक माहिती साठी ९७४९३४३६०७ ह्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आमच्या ऑफिसला संपर्क साधा, असे मॅसेजव्दारा सांगण्यात आले.
क्विक सपोर्ट ॲप्सच्या माध्यमातून चुना- ग्राहकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता ग्राहकाला कोणीही प्रतिसाद दिला नाही.परंतु काही मिनिटांच्या आत त्याच नंबर वरून ग्राहकाला कॉल आला. तुमचे लाईट बिल थकले असून आज पुरवठा आज रात्री खंडित करण्यात येईल. ते भरायचे असेल तर ऑनलाइन प्रोसेस करून आत्ता आपण भरू शकतात असे सांगण्यात आले. व्यापाऱ्याचे १८३० रुपये लाईट बिल थकीत होते. वीज पुरवठा खंडित केला जाईल यामुळे व्यापारी घाबरला आणि ऑनलाईन बिल भरतो होकार दिल्यावर व्यापाऱ्याला क्विक सपोर्ट हे ॲप्स डाऊनलोड करायला सांगितले. क्विक सपोर्ट डाऊनलोड करून एक आय डी पाठविण्यात आला.ग्राहकाने तो आय डी टाकला आणि ग्राहक व्यापारी तिथेच फसला.