महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

50 टक्के अनुदानात शेतकऱ्यांना भात पिक बियाणे मिळणार - सभापती शेळके

पंचायत समिती कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी महाबीज महामंडळाकडून भात पिक बियाणे हे 50 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती वाडा पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके यांनी दिली.

By

Published : May 27, 2019, 9:05 PM IST

50 टक्के अनुदानात शेतकऱ्यांना भात पिक बियाणे मिळणार - सभापती शेळके

वाडा (पालघर) - पंचायत समिती कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी महाबीज महामंडळाकडून भात पिक बियाणे हे 50 टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती वाडा पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके यांनी दिली. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

50 टक्के अनुदानात शेतकऱ्यांना भात पिक बियाणे मिळणार - सभापती शेळके

यावेळी त्या म्हणाल्या, वाडा तालुक्यात खरीप हंगामासाठी भात बियाण्यांचे कर्जत -3 चे 230 क्विंटल व कर्जत- 7 चे 30 क्विंटल बीयाणे वाटप केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यात सर्वात जास्त बियांण्याचे वाटप केले जाणार आहे. वाडा तालुक्यात भातलागवडीखालील क्षेञ 14 हजार 800 हेक्टर इतके आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details