वसई -मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने (drugs seized by ATS in Vasai ) वसईत (drugs seized in Vasai) मोठी कारवाई केली आहे. वसईच्या पेल्हार गावातून 1724 ग्रॅम हेराॅईन नावाचं ड्रग्स (अमली पदार्थ) जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेल्या हेराॅईनची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी इतकी किंमत आहे. या कारवाईत पोलीसांनी 2 लाख 60 हजार रोख रक्कमही जप्त केली आहे.
drugs seized by ATS in Vasai : वसईत 5 कोटींचे ड्रग्स एटीएसने केले जप्त - ATS in Vasai
वसईच्या पेल्हार गावातून 1724 ग्रॅम हेराॅईन नावाचं ड्रग्स (अमली पदार्थ) जप्त केलं आहे. या प्रकरणी एटीएसने अलीम मोहम्मद अख्तर (वय 46) , छोटा मोहम्मद नासीर (वय 40) या दोन ड्रग तस्करांना अटक केली आहे.
Vasai
या प्रकरणी एटीएसने अलीम मोहम्मद अख्तर (वय 46), छोटा मोहम्मद नासीर (वय 40) या दोन ड्रग तस्करांना अटक केली आहे. हे दोघेही उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातले आहेत. वसईत एक फ्लॅट भाड्याने घेऊन ते हे अमली पदार्थाची तस्करी करत होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनाही हे ड्रग्ज राजस्थानहून बुटाच्या सोलमध्ये लपवून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
Last Updated : Feb 7, 2022, 2:49 PM IST