पालघर- वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथे शहापूर तालुक्यातील पिवळीहून वाड्याकडे येणाऱ्या बसला सकाळी 6. 45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये 57 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील रामनवमी प्रसाद (वय 38) व सुमन प्रसाद (वय 35) दोघांना उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले आहे.