महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुजरातमध्ये अडकलेले ४५९ खलाशी कामगार डहाणू किनारी दाखल - गुजरातमध्ये अडकलेले खलाशी कामगार डहाणू किनारी दाखल

गुजरात राज्यात अडकलेल्या ४५९ खलाशी कामगारांना आज (शनिवार) जिल्ह्यातील डहाणू किनारी उतरवण्यात आले. या सर्वखलाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

palghar
गुजरातमध्ये अडकलेले ४५९ खलाशी कामगार डहाणू किनारी दाखल

By

Published : May 2, 2020, 4:34 PM IST

Updated : May 2, 2020, 7:35 PM IST

पालघर - गुजरात राज्यात अडकलेल्या ४५९ खलाशी कामगारांना आज (शनिवार) जिल्ह्यातील डहाणू किनारी उतरवण्यात आले. या सर्वखलाशांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.


देशात लॉकडाऊनच्या काळात गुजरात राज्यातील मेंगलोर, वेरावल, पोरबंदर भागात पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागातील मजूर खलाशी कामगार अडकले होते. लॉकडाऊन काळात ते येत असताना त्यांना उबरगाव येथे विरोध झाला. त्यामुळे पुन्हा ते गुजरातच्या समुद्री भागात निघून गेले. त्यांनतर त्या खलाशांना आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती.

आतापर्यंत डहाणू आणि झाई भागात पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महसुली विभाग लोकप्रिनिधींच्या उपस्थितीत १० हजारहून अधिक मजूर, खलाशी कामगारांनी उतरून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. डहाणुतील सेंटमेरी हायस्कूलमध्ये त्यांना काही दिवस ठेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत होते.

गुजरातमध्ये अडकलेले ४५९ खलाशी कामगार डहाणू किनारी दाखल


२ मे ला (शनिवार) सकाळी ६ बोटींमधून हे खलाशी मजूर, कामगार दाखल झाले आहेत. यात ४५९ कामगार होते. हे खलाशी डहाणू आणि तलासरी भागातील असून, अजून काही कामगारांच्या बोटी येणे बाकी आहेत. यावेळी तलासरी पंचायत समितीचे सभापती नंदू हडळ, जिल्हा परिषद सदस्य रामू पागी उपस्थित होते. त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Last Updated : May 2, 2020, 7:35 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

video -image

ABOUT THE AUTHOR

...view details