ठाणे- शहरात एकाच दिवशी नवीन ११ रुग्ण आढळले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या ४७ आहे. त्यापैकी दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आता शहरात ४३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तब्बल ४९ जणांचे चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.
मिरा भाईंदरमध्ये ४३ जण कोरोनाबाधित, ४९ जणांचे अहवाल प्रलंबित - मिरा भाईंदरमध्ये ४३ जण कोरोनाबाधित
मीरा भाईंदर महापालिकेने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या ४७ आहे. त्यापैकी दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आता शहरात ४३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तब्बल ४९ जणांचे चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.

महापालिकेने कोरोनाची आकडेवारी देताना शहरात एकूण १०३४ जणांची पडताळणी केली आहे. यातील ३७१ जणांनी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ६६३ जणांना पालिकेच्या देखरेखीखाली क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी ४७७ जणांना घरातच तर १२६ जण महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात पालिकेच्या देखरेखीखाली आहेत. तर, ६० जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
महापालिकेचे जोशी रुग्णालय फक्त कोरोनाच्या उपचारासाठी राखीव केले आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार विलगीकरण कक्षात ६० जण आहेत. त्यापैकी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर येथे ५३ जण आहेत. तर, २ जण कोकिळाबेन अंधेरी येथे, ३ सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि एकजण ट्रामा केअर सेंटर जोगेश्वरी व भक्तीवेदांत हॉस्पिटल मिरारोड येथे ऍडमिट आहेत. ज्यांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्या ३७१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर २२५ जणांची स्वॅब टेस्ट (SWAB TEST) घेण्यात आलेली आहे, त्यांचा अहवाल अजून आलेला नाही.