पालघर - राज्यभरात आजपासून सुरू झालेल्या उच्च माध्यमिक (१२ वी) परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून कला, वाणिज्य व विज्ञान अशा वेगवेगळ्या शाखांमधून विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 43 केंद्रातून 39 हजार 533 विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेस बसणार आहेत. परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेला सुरुवात, पालघरमध्ये 39 हजार 533 विद्यार्थी देणार परीक्षा - 43 केंद्र
केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातून कला शाखेतून १० हजार ३२४ , शास्त्र/विज्ञान शाखेतून १२ हजार ४६१, वाणिज्य शाखेतून १६ हजार ८०० तर एमसीव्हीसीमधून (तंत्रशिक्षण) ५३७ असे एकूण ४० हजार १२२ विद्यार्थी आहेत. वाडा तालुक्यातील ३ केंद्रांमधून 2926 विद्यार्थी, मोखाडा तालुक्यातील ३ केंद्रांमधून १२४९ , विक्रमगड तालुक्यातील २ केंद्रांमधून १८०२ , जव्हारमध्ये १ केंद्रामधून १३३३ तलासरी तालुक्यातील चार केंद्रांमधून २२३२ तालुक्यातील ४ केंद्रांमधून ९४ पालघर तालुक्यातील ३ केंद्रांमधून ६१९६ तर सर्वाधिक वसई तालुक्यातील २३ केंद्रांमधून २०३०२ विद्यार्थी असे एकूण ४३ केंद्रातून ३९ हजार ५३३ विद्यार्थी ही बारावीच्या परीक्षेस बसणार आहेत.