पालघर Community Marriage Ceremony : आपण वेगवेगळे शाही विवाह सोहळे पार पडताना पाहिले असतील पण पालघर धनसार येथील आनंद वृद्धाश्रम सेवा ट्रस्टने आयोजीत केलेला सामुदायिक विवाह सोहळा (Tribal Couples Community Wedding) जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 'इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट' च्या (Innerwheel Club of Bombay Airport) सोहळ्यात वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांनी गाजलेल्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर तुफानी डान्स करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी तरुणांना लाजवेल असं नृत्य त्यांनी सादर केलं. या झिंगाट नृत्याचा व्हिडिओ (Zingaat Dance viral video) समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
वृद्धाश्रमात केला जातो सांभाळ: अनेकजण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात. वृद्धाश्रम म्हटलं की, परिवाराकडून सुश्रुषा होत नसलेल्या आई वडिलांना अखेर वृद्धआश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळं पारिवारिक कुठलही प्रेम मिळत नाही. त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागतात. या सर्व गोष्टीपासून त्याना कुठल्याही दुःखद वेदना सहन कराव्या लागू नयेत, याकरता वृद्धाश्रमात त्यांची परिवाराप्रमाणे सुश्रुषा करण्यात येते. अशाच प्रकारचे असलेले पालघरमधील 'आनंद आश्रम सेवा ट्रस्ट'मध्ये (AnandAshram Seva Trust) वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात.