पालघर/वसई- राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वसईत कोरोना रुग्णांचा आकडा आता 67 वर गेला आहे. आज नव्याने वसई विरार महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील २ परिचारिका आणि एका वॉर्ड बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेटीट रुग्णालयातील एकूण संख्या पाच झाली असून आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
वसईत शुक्रवारी ४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले - vasai corona news
आज नव्याने वसई विरार महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील २ परिचारिका आणि एका वॉर्ड बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
वसई
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1 हजार 766 जण उपचारानंर बरे झाले असून 452 जण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिली आहे.