महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरात वाहून गेलेल्यांच्या वारसांना शासनाकडून 4 लाखांची मदत, एक जण अद्यापही बेपत्ताच - गुंधुनपाडा

त्यांचा पुतण्या काकड बाबन उंबरसाडा (४०) याना काळातच ते काका जाना उंबरसाडा यांना शोधण्यासाठी साकळतोडी नदीवर गेले. मात्र, काकडही काकांचा शोध घेण्यासाठी नदीसमोरील नाल्यात उतरे असता वाहून गेले.

मृतांच्या वारसांना ४ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

By

Published : Jul 5, 2019, 9:43 AM IST

Updated : Jul 5, 2019, 8:49 PM IST

पालघर(वाडा)- जव्हार तालुक्यातील दाभालोन येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरात वाहून गेलेल्या गुंधुनपाडातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात गुंधुनपाडा येथील काका, पुतण्या आणि सरसून येथील पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. ४ जुलै रोजी गुंधूनपाडा येथील काका व पुतण्यांच्या वारसांना ४ जुलैला जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी शासनाच्या वतीने मदत म्हणून चार लाखाचे धनादेश सुपूर्द केले आहेत. तर सरसून येथील व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

गुंधुनपाड्यातील जाना सोनू उंबरसाडा (६०) हे सोमवारी १ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नदीकडील शेतावर गेले होते. संध्याकाळच्या वेळी जाना उंबरसाडा हे नदीत पाय घसरून वाहून गेल्याचे काही शेतकऱ्यांना समजले.

त्यानंतर त्यांचा पुतण्या काकड बाबन उंबरसाडा (४०) याना काळातच ते काका जाना उंबरसाडा यांना शोधण्यासाठी साकळतोडी नदीवर गेले. मात्र, काकडही काकांचा शोध घेण्यासाठी नदीसमोरील नाल्यात उतरे असता वाहून गेले. जव्हारमधील सरसून येथील रहिवासी रहाऊ महाद्या गोरात (45) चार वाजता लेंडी नदीतील पुरात वाहून गेले. मात्र, त्यांचा मृतदेह सापडला नाही, अशी माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली. जव्हार तालुक्यात झालेल्या या पावसामुळे तीन जण वाहून गेले होते.

Last Updated : Jul 5, 2019, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details