पालघर- तालुक्यातील बोईसर येथील कोरोनाबधित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पालघर तालुक्यातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
पालघर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी; बोईसर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पालघर तालुक्यातील उसरणी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा व मुंबई- सायन येथून पालघर येथे काही दिवसांकरता वास्तव्यासाठी आलेल्या एका महिलेचा सायन येथे कोरोनामुळे यापूर्वी मृत्यू झाला होता.
बोईसर दलाल टॉवर येथील ३५ वर्षीय तरुणाला आपल्या कुटुंबातील व्यक्तीला मुंबईत उपचारासाठी नेऊन परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पालघर तालुक्यातील उसरणी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा व मुंबई- सायन येथून पालघर येथे काही दिवसांकरता वास्तव्यासाठी आलेल्या एका महिलेचा सायन येथे कोरोनामुळे यापूर्वी मृत्यू झाला होता. आतापर्यंत कोरोनामुळे पालघर तालुक्यातील तीन, तर वसई ग्रामीण तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मृतांची ५ संख्या झाली आहे.