पालघर- वसई विरारमध्ये 24 तासात 38 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर एका 46 वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वसई विरारमध्ये आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या 732 वर पोहोचली आहे.
वसई विरारमध्ये 24 तासात आढळले 38 नवे कोरोनाबाधित रुग्ण - लेटेस्ट न्यूज इन पालघर
आता वसई-विरारमधील एकूण मृत्यू संख्या 25 झाली आहे, तर आज कोरोना आजारावर मात करून 24 जण घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 289 वर गेली आहे.

वसई विरार महापालिका
नालासोपारा पूर्वेकडील 46 वर्षीय रुग्ण एका रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला आहे. आता वसई-विरारमधील एकूण मृत्यू संख्या 25 झाली आहे. तर आज कोरोना आजारावर मात करून 24 जण घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 289 वर गेली आहे. तर 418 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत.