महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण; कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची बदली - kasa police 35 employee transfer

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 101 आरोपींना अटक केली आहे. मात्र, आता कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची देखील जिल्ह्यात इतरत्र तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

kasa police station
kasa police station

By

Published : Apr 29, 2020, 7:12 AM IST

पालघर - गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने तिघांची हल्ला करून हत्या केली होती. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली असून पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी ही कारवाई केेली आहे.

डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. हा मुद्दा देशभर गाजला. तसेच हे प्रकरण पोलीस हाताळत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर कासा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 101 आरोपींना अटक केली आहे. मात्र, आता कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची देखील जिल्ह्यात इतरत्र तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details