महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' तीन वर्षीय चिमुकलीचा कोरोना फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह - कोरोना अपडेट पालघर

डहाणू तालुक्यातील चिमुकलीचा बाहेरच्या देशात प्रवास केलेल्या व्यक्तीसोबत थेट संपर्त आला नसताना तिला कोरोनाचे लक्षणे दिसत होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तिची स्वॅब चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

'त्या' तीन वर्षीय चिमुकलीचा कोरोना फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह
'त्या' तीन वर्षीय चिमुकलीचा कोरोना फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह

By

Published : Apr 15, 2020, 2:27 PM IST

पालघर- डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा करोना फेर तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे पालघर आरोग्य विभागाने सांगितले आहे. पालघर तालुक्यातील काटाळे याठिकाणी असलेल्या वीटभट्टीवर या मुलीचे पालक काम करत होते. या मुलीला प्रथम मासवण नंतर कासा व पुढे डहाणूच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले होते.

संबंधित चिमुकलीचा बाहेरच्या देशात प्रवास केलेल्या व्यक्तीसोबत थेट संपर्त आला नसताना तिला कोरोनाचे लक्षणे दिसत होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तिची स्वॅब चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली. त्यामुळे आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, खबरदारी म्हणून पालघर तालुक्यातील मासवण व काटाळे विभागातील २०, डहाणू तालुक्‍यातील सुमारे ४०, तर विक्रमगड येथील सुमारे १५ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details