पालघर(वसई-विरार) - कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. पालघरच्या वसईमध्ये कोरोनाचे नवीन तीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे पालघरमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०४ झाला आहे.
वसईमध्ये कोरोनाचे 3 नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू - कोरोनाबाधित
पालघरच्या वसईमध्ये कोरोनाचे नवीन तीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे पालघरमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०४ झाला आहे. शुक्रवारी वसईमध्ये एका 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला असून पालघरमधील मृतांची संख्या 9 झाली आहे. आत्तापर्यंत 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
![वसईमध्ये कोरोनाचे 3 नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू Vasai Corona Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6932509-285-6932509-1587793686121.jpg)
वसई कोरोना अपडेट
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये वसईतील 49 वर्षीय महिला, नालासोपाऱ्यातील 58 वर्षीय पुरुष आणि संयुक्त नगरमधील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नालासोपाऱ्यातील 58 वर्षीय पुरुष रुग्ण हा मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी आहे तर संयुक्त नगरमधी 55 वर्षीय व्यक्ती ही मुंबईतील एका रुग्णालयात कर्मचारी आहे.
बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले
शुक्रवारी वसईमध्ये एका 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला असून पालघरमधील मृतांची संख्या 9 झाली आहे. आत्तापर्यंत 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.