महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 8, 2021, 7:28 AM IST

ETV Bharat / state

27 वर्षीय विवाहित तरुणाचा खून; कारण अस्पष्ट

वाडा तालुक्यातील तुंबडेपाडा या ठिकाणी एका विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला. मृत तरूण हा विक्रमगड तालुक्यातील रहिवासी असून, तो गेल्या एक महिन्यापासून पत्नीच्या माहेरी राहत होता.

crime
क्राईम

पालघर - विक्रमगड तालुक्यातील माळे गावातील एका विवाहित तरुणाचा खून झाला. करण गोपाल रेंजड (वय 27), असे मृत तरुणाचे नाव आहे. वाडा तालुक्यातील तुंबडेपाडा या ठिकाणी अनोळखी व्यक्तीने त्याच्या डोक्यात हत्याराने वार करत त्याचा खून केला. ही घटना झाली तेव्हा मृत करण सासरवाडीहून आपल्या घरी जात होता. करण रेंजड यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरापासून होते सासरवाडी येथे वास्तव्य -

मृत करण रेंजड हा मुळचा विक्रमगड तालुक्यातील माळे गावातील रहिवासी आहे. तो गेल्या महिन्यापासून आपल्या पत्नीच्या माहेरी, उमरोठे येथे पत्नीसोबत राहत होता. घटना झाली त्या दिवशी तो उमरोठे येथून माळे गावात जात होता.

मृताचे इतर महिलबरोबर अनैतिक संबध -

करण रेंजड याचे अन्य महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबत त्याच्या पत्नीने विचारणा केली होती. त्यानंतर घरी जातो सांगून करण 5 फेब्रुवारीला रात्री निघाला. घरी निघालेल्या पती आपल्या माळे गावी पोहचला की नाही म्हणून पत्नीने घरी चौकशीसाठी दुस-या दिवशी फोन केला. तेव्हा तो घरी न गेल्याचे समजले. यानंतर करणचा शोध घेतला असता, तुंबडेपाडा येथील एका झोपडी जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात हत्याराने वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details