पालघर - भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या 24 वर्षांच्या एका आरोपीने नवी दिल्लीत आयएफएस ऑफिसर असल्याचा बनाव रचला. यानंतर त्याने एका महिलेस नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पीडित महिलेच्या पतीने गुरुवारी रात्री नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बनावट अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. यूपीएससी परीक्षा पास करून फॉरेन डिपार्टमेंटमध्ये सल्लागारपदावर नोकरी देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते.
महिलेची फसवणूक... तोतया 'सरकारी बाबू' गजाआड - नालासोपारा महिलेची फसवणूक
नालासोपाऱ्यात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करणारे दिनेश बाबुराव तांबे (वय - 42) यांच्या पत्नीची नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे.
अधिकारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक...तोतया 'सरकारी बाबू'चा बनाव उघड
त्याच्याकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सही व शिक्के असलेली बनावट कागदपत्रे सापडल्याचेही प्राथमिक वृत्त आहे. तसेच आरोपीला परदेशी भाषा येत असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.