वसई-विरार (पालघर)- वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
वसई विरार मध्ये एका दिवसात वाढले 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - कोरोना न्यूज वसई विरार
24 रुग्णांची वाढ झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 492वर जाऊन पोहोचली आहे. तर, 221 जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
वसई विरार कोरोना अपडेट
24 रुग्णांची वाढ झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 492 वर जाऊन पोहोचली आहे. रविवारी 68 वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
रविवारी 7 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 221 झाली आहे तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 245 जणांवर उपचार सुरू आहेत.