महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये बुधवारी 229 नविन बाधितांची नोंद; 163 जणांची कोरोनावर मात - वसई विरार कोरोना अपडेट

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 760वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 177 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

vasai virar mnc isolation centre
वसई विरार मनपा विलगीकरण कक्ष

By

Published : Jul 16, 2020, 12:47 PM IST

पालघर - वसई विरारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. दर दिवशी सरासरी 150 ते 200 नवीन बाधित आढळत आहेत. याचप्रमाणे बुधवारी वसई-विरारमध्ये 221 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 163 जणांनी कोरोनावर मात केली. तर 3 बाधितांचा मृत्यू झाला.

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 760वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 177 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 6 हजार 1 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत 2 हजार 582 बाधितांवर उपचार सुरू आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.

हेही वाचा -COVID-19 गुणपत्रिका प्रकरण : समितीने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला पाठवला अहवाल

ABOUT THE AUTHOR

...view details