महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये मोटरसायकल चोरी करणारे दोघे गजाआड, 12 दुचाकी जप्त - नालासोपारा

नालासोपारा, वसई-विरार भागात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. यामुळे आता नालासोपारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून याबाबत तपास व शोध सुरू केला आहे.

पालघरमध्ये मोटरसायकल चोरी करणारे दोघे गजाआड, 12 दुचाकी जप्त

By

Published : Jul 6, 2019, 10:29 AM IST

पालघर- नालासोपारा, वसई, विरार भागात मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. अमन आरिफ शेख (वय19) संदिप वसंत रसाळ (वय 27)अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पालघरमध्ये मोटरसायकल चोरी करणारे दोघे गजाआड, 12 दुचाकी जप्त

नालासोपारा, वसई-विरार भागात अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्यानंतर नालासोपारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून याबाबत तपास व शोध सुरू केला. यादरम्यान एक व्यक्ती नालासोपारा श्रीप्रस्था, फोर्थ रोड येथे दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी अमन असिफ शेख याला अटक केली. अटक केलेला आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच वाडा-खडकोना मनोर येथील संदिप रसाळ याला मोटारसायकली विकल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रसाळ याला अटक केली.

उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड व नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाट, महेश पागधारे, किशोर धनु, रुस्तम राठोड, हर्षद चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details