महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये कार अन् कंटेनरचा अपघात, २ जण गंभीर जखमी - mumbai ahmadabad highway

पालघरमध्ये कार आणि कंटनेरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर झाले असून दोघेही घणसोली येथील रहिवासी आहेत.

पालघरमध्ये कार अन् कंटेनरचा अपघात

By

Published : Sep 21, 2019, 10:48 PM IST

Updated : Sep 21, 2019, 11:19 PM IST

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंप येथे कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघरमध्ये कार अन् कंटेनरचा अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपवर वळण्यासाठी अनधिकृत रस्ता सोडलेला आहे. त्यामुळे याठिकाणी अनेकदा अपघात होत असतात. शनिवारी देखील सीएनजी भरण्यासाठी वळण घेत असताना कारला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून दोघेही घणसोली येथील रहिवासी आहेत.

Last Updated : Sep 21, 2019, 11:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details