पालघर - मीरा-भाईंदर परिसरात आज दोन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता मीरा-भाईंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये आणखी दोन कोरोना 'पॉझिटिव्ह' - corona in palghar
मीरा-भाईंदर परिसरात आज दोन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता मीरा-भाईंदर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे.
मीरा भाईंदरमध्ये आणखी दोन 'पॉझिटिव्ह'
नव्याने सापडलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्यांची कोणतीही प्रवासाची पार्श्वभूमी नाही. सध्या आरोग्य विभाग त्यांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीची माहिती मिळवत असून या दोनही महिला गृहिणी आहेत. तसेच एक महिला एस.व्ही रोड तर दुसरी महिला नारायणनगर परिसरातील आहे. दोनही महिला 55 ते 60 वयोगटातील आहेत. यानंतर त्या वास्तव्यास असलेले परिसर बंद करण्यात आले आहेत.