महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरार शहरात दिवसभरात १८ नविन कोरोना रुग्ण - corona patients in vasai virar

वसई-विरार शहरात आज दिवसभरात १८ नविन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या आता ३०७ वर पोहचली आहे.

वसई विरार
वसई विरार

By

Published : May 16, 2020, 11:24 PM IST

पालघर -मुंबईसह उपनगरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. वसई-विरार शहरात आज दिवसभरात १८ नविन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या आता ३०७ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

वसई विरार

बाधित रुग्णांचा तपशील

रुग्ण क्र. २९०- नालासोपारा पूर्वेकडील ३८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे.

रुग्ण क्र. २९१- विरार पूर्वेकडील ४४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (वॉर्डबॉय) आहे.

रुग्ण क्र. २९२- नालासोपारा पूर्वेकडील ३२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण फोटोग्राफर असून मुंबई येथे नोकरीस आहे.

रुग्ण क्र. २९३- नालासोपारा पश्चिमेकडील ४३ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील मेन्टेनेन्स विभागातील कर्मचारी आहे.

रुग्ण क्र. २९४- नालासोपारा पश्चिमेकडील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (वॉर्डबॉय) आहे.

रुग्ण क्र. २९५,२९६,२९७ व २९८ - नालासोपारा पश्चिमेकडील एकाच कुटुंबातील हे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. रुग्ण कोविड रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील आहेत मध्ये ५५ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरुष व १० दिवसांची मुलगी यांचा समावेश आहे.

रुग्ण क्र. २९९- विरार पूर्वेकडील २० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्णाचा मुंबई प्रवास आहे.

रुग्ण क्र. ३००- विरार पश्चिमेकडील ३६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (वॉर्डबॉय)आहे.

रुग्ण क्र.३०१- विरार पश्चिमेकडील २८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील सुरक्षा रक्षक (सेक्युरिटी गार्ड) आहे.

रुग्ण क्र. ३०२- नायगाव पूर्वेकडील २८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे.

रुग्ण क्र. ३०३- नालासोपारा पूर्वेकडील ३६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण वसई विरार महापालिका वैद्यकीय विभागाचा कर्मचारी (वॉर्डबॉय) आहे.

रुग्ण क्र. ३०४- विरार पूर्वेकडील ४१ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (वॉर्डबॉय) आहे.

रुग्ण क्र.३०५- विरार पूर्वेकडील ३१ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (वॉर्डबॉय) आहे.

रुग्ण क्र. ३०६- विरार पूर्वेकडील ४७ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयातील कर्मचारी (इंजिनिअरीग डिपार्टमेन्ट) आहे.

रुग्ण क्र. ३०७- वसई पश्चिम येथील २९ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. रुग्ण मुंबई येथील बँकेचा कर्मचारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details