पालघर- जिल्हा परिषदेच्या फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रभाग रचना आरक्षण संदर्भात 16 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. 4 डिसेंबरला कोकण आयुक्तांकडे या हरकतींवर सुनावणी होणार आहे.
पालघर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाबाबत 16 हरकती दाखल हेही वाचा -भाजप नेत्यांनी देशातील संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे - उदय सामंत
पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी प्रभाग रचना आरक्षण जाहीर झाले होते. प्रभाग प्रश्नांसंदर्भात विक्रमगड व वाडा येथून प्रत्येकी एक अशा 2 हरकती घेण्यात आल्या आहेत. यात प्रभागांमध्ये झालेल्या गावांच्या समावेशाबाबत तक्रारदारांचे हरकत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चक्राकार पद्धतीने जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी तसेच महिला उमेदवारांसाठी असलेले आरक्षण फिरवण्यात आल्याने याबाबत वेगवेगळ्या प्रभागातील 14 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
या हरकतींबाबत 4 डिसेंबरला कोकण आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात येणार असून याबाबत निकाल लागल्यानंतर 7 डिसेंबरला अंतिम प्रभागरचना आणि त्यावरील आरक्षण जाहीर केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील सागरी व नागरी भागात अधिक जागांवर आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे अनेक प्रस्थापितांचे भवितव्य धोक्यात आले असून निवडणुकीतील चूरस कमी झाल्याचे चित्र आहे.