पालघर : गुजरात राज्यातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींना पाकिस्तानच्या मेरिट टाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात ( Merit Time Security Agency Detained Two Boats ) घेतले ( Pakistan India People Forum for Peace and Democracy ) असून, त्यातील अटक केलेल्या एकूण १६ खलाशी कामगारांपैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई ( People Forum for Peace and Democracy Jatin Desai ) ह्यांनी दिली.
Pakistani Forces Arrested 16 Indian Fishermen : 16 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी सेनेने घेतले ताब्यात; त्यापैकी 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील
गुजरात राज्यातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींना पाकिस्तानच्या मेरिट टाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात घेतले ( Pakistan India People Forum for Peace and Democracy ) असून, त्यातील अटक केलेल्या एकूण १६ खलाशी कामगारांपैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई ह्यांनी दिली.
पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटींचा भारतीय मच्छीमार बोटींना घेराव :गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा व अन्य एक मच्छीमार बोट आपल्या बंदरातून मासेमारीसाठी नेहमीप्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. या दोन्ही बोटी मासेमारी करताना अचानक पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटींनी भारतीय मच्छीमार बोटींना घेराव घातला. त्या दोन्ही बोटीसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही बोटीत असलेल्या खलाशांपैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असून, अन्य ९ खलाशी हे गुजरात राज्यातील आहेत.
पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील मच्छिमाराचा मृत्यू :भारत सरकारने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नसल्याने आजही निष्पाप खलाशी कामगार कारागृहात खितपत पडले आहेत. गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय 32 वर्ष) या मच्छीमार तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. दोन्ही देशाने आपापसांत समझोता करून एकमेकांच्या हद्दीत आलेल्या मच्छीमार बोटी व त्यातील खलाशाना सक्त सूचना देऊन परत आपल्या भागात जाण्यास भाग पाडले गेले पाहिजे, असे मत जतिन देसाई यांनी व्यक्त केले.