पालघर- जिल्ह्यातील अयोध्येच्या निकालाप्रकरणी आज वाडा पोलीस ठाण्यात शांतता बैठक पार पडली. कुणीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकू नये, असे आदेश देण्यात आले. तसेच जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आली.
अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू - Ayodhya Result
पालघर जिल्ह्यातील अयोध्येच्या निकालाप्रकरणी आज वाडा पोलीस ठाण्यात शांतता बैठक पार पडली. कुणीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकू नये, असे आदेश देण्यात आले. तसेच जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आली.
![अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5014755-152-5014755-1573309112087.jpg)
अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
अयोध्या निकालाप्रकरणी पालघर जिल्ह्यात २१ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
ही बैठक वाडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनावणे, पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
न्यायालयाचा निर्णयानंतर शांतता राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जमावबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमिवर सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस उपविभागिय अधिकारी जव्हार यांनी केले आहे.
Last Updated : Nov 9, 2019, 8:05 PM IST