पालघर: वाडा तालुक्यातील तीळगाव येथील आदिवासी रूग्ण सारंग गणेश बेंडकोळी या १४ वर्षीय मुलाला १०४ ताप आला होते. त्याची श्री साईकृपा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. बालकाला सलाईन सुरू असताना ती काढून टाकून ट्रीटमेंट नाही देत जा असे सांगत डॉक्टरने सारंगचे वडीलां बाहेर काढल्याची घटना हॉस्पिटलमध्ये घडली आहे. डॉ. जितेन्द्र पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. येथील नर्सने मुलाच्या वडिलांशी उर्मट वर्तन करत अपमानित केल्याने, वडिलांनी वाद घातला होता. डॉक्टरने थेट मुलाचा जीव धोक्यात टाकून मुलाला व आई वडिलांना बाहेरचा रस्ता दाखवला. एवढेच करून डॉक्टर थांबला नाही तर स्वतः च्या राजकीय आणि आर्थिक प्रभावाचा वापर करत, उलट आदिवासी रूग्ण सारंग याच्या आई वडिलांच्या विरोधात वाडा पोलिसांत तक्रार केली.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर :कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जपणामुळे रुचिता वड या आदिवासी विवाहितेचा मृत्यु झाल्यानंतर, तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसागणीक एक ना अनेक प्रश्न सामोर येत आहेत. याच कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रापासून साईकृपा हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर आहे. येथील आरोग्य केंद्रात केवळ रुग्णाची जबाबदारी ढकलून त्यांना उपचार नाकारला जात आहे. तर तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय हे गेली वर्षानुवर्षे असुविधांच्या विळख्यात आहे. येथे बालरोगत्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ नियुक्त असताना येथेही रूग्ण नाकारले जातात. त्या प्रमाणे सारंगला देखील उपचार नाकारला, मग त्याला कुडुस येथे साईकृपा हॉस्पिटलमध्ये आणले होते.