महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरार शहरात नवीन १४ रुग्णांची नोंद, तालुक्यातील एकूण संख्या १८९वर - vasai virar corona patient

वसई-विरार परिसरात शुक्रवारी १४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांसह तालुक्यातील रुग्णसंख्या १८९वर पोहोचली आहे.

corona virus in vasai virar
वसई विरार शहरात नविन १४ रुग्णांची नोंद, तालुक्यातील एकूण संख्या १८९वर

By

Published : May 9, 2020, 9:43 AM IST

वसई-विरार(पालघर) - मुंबईसह परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार परिसरात शुक्रवारी १४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या १८९वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

येथे नालासोपारा पुर्वेकडिल २३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आहे. ही महिला कॉलसेंटरमधील कर्मचारी आहे. रुग्णास उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केले आहे. तर, याच भागातील २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण मुंबईच्या रुग्णालयात वॉर्डबॉय आहे.

दरम्यान, याच भागातील दोन कुटुंबातील सात रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण कोविड रुग्णांच्या हायरिक्स संपर्कातील आहेत. चारही रुग्णांना उपचारासाठी नालासोपारा पश्चिमेकडिल रुग्णालयात दाखल केले आहे.

वसई पुर्वेकडील ३४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. तर याच भागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर मुंबईतील रुग्णालयात आपली सेवा देत होते. या रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तर नालासोपारा पुर्वेकडील ४६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्ण मुंबईत बस ड्रायव्हर आहे.

वसई विरार शहरात नविन १४ रुग्णांची नोंद, तालुक्यातील एकूण संख्या १८९वर
विरार पूर्वेकडील २३ वर्षीय पुरुष (प्रशिक्षणार्थी डॉक्टर) कोरोना पॉझिटीव्ह आहे. रुग्णास महापालिकेच्या वसई पुर्वेकडील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. हा रुग्ण मुंबईतील हॉटेल कर्मचारी आहे. त्याला मुंबईत इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details