महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारमध्ये जुगार अड्डयावर छापा; १३ जणांना अटक, १० महिलांचाही समावेश - पालघर गुन्हे

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणाऱ्या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, आरोपींविरूध्द अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

By

Published : Aug 24, 2019, 8:31 PM IST

पालघर - पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम विरारमध्ये जुगार खेळणा-या १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील आगाशी चाळपेठ येथील शीतल नामक इमारतीच्या छतावर काही महिला व पुरुष जुगार खेळत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सिद्ध्वा जायभाये यांना मिळाली. यानंतर त्यांनी इमारतीवर छापा टाकला.

यामध्ये वर्षा गाला (५२), सविता उपाध्याय (६०), वासंती छेडा (५३), जसुबेन सागर (६०), हीना पांचाळ (५७), देवी बेहीरायी (६५), हेतल उपाध्याय (३३), दुर्गा भाटीया (६०), ख़ुशी सोढा (३६), ज्योती गाला (४९) यांसह अशोक मोरे (४०), हितेन घोगरे (६०), धर्मेश लोहार (३४) यांना अटक केले आहे. त्यांच्याकडून २६,७८० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींविरूध्द मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details