वसई-विरार (पालघर) - शहरातील रुग्णसंख्येने 24 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येसोबतच शहरात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहेत.
वसई विरारमध्ये 24 तासांत 124 जण कोरोनाबाधित; 15 रुग्णांचा मृत्यू
वसई-विरार शहरात वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मंगळवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 124 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून दिवसभरात उपचारादरम्यान 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 124 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 24 हजार 706 वर गेली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 510 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 22 हजार 676 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 हजार 520 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.