महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : बोईसर येथे अवैधरित्या राहणाऱ्या 12 बांगलादेशींना 'एटीएस'ने केली अटक

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे अवैधरित्या राहणाऱ्या महिलांसह 12 बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

अटक केलेल्या बांगलादेशींसह पोलीस पथक
अटक केलेल्या बांगलादेशींसह पोलीस पथक

By

Published : Dec 17, 2019, 4:14 AM IST

Updated : Dec 18, 2019, 1:28 AM IST

पालघर- जिल्ह्यातील बोईसर येथे अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 9 महिला व 3 पुरुष अशा एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना पालघर दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.

माहिती देताना सहय्यक पोलीस निरीक्षक

याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बोईसर येथील यशवंत शृष्टी भागात बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव करत असल्याची माहिती पालघर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने बोईसरच्या यशवंत सृष्टी परिसरात छापा टाकला आणि एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. इस्माईल अखिल शेख (वय 35 वर्षे), हिरोज अब्दुल्ला खान (वय 36 वर्षे), इराण रहिमखान (वय 50 वर्षे), राबिया नूर इस्लाम काझी (वय 35 वर्षे), रानुमोल्ला तूतामिया शोदत्त (वय 35 वर्षे), नूरजहाँ आक्षु शेख (वय 30 वर्षे), माबिया इमरान शिकदार (वय 40 वर्षे), सोनाली इक्ततार मुल्ला (वय 24 वर्षे), शैनाज गाउज शेख (वय 25 वर्षे), नाजिया टूटल शेख (वय 34 वर्षे), शुमी रसेल शेख (वय 32 वर्षे), शिरीना इस्टनफिल शेख (वय 25 वर्षे) अशी अटक केलेल्या या 12 बांगलादेशी नागरिकांची नावे आहे.

ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्ष व अँटी ह्यूमन ट्राफिकींगच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केली आहे. अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांविरोधात विरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी नागरीक अधिनियम कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - वसईत अमेरिकेतून परतलेल्या सुनेची सासूकडून हत्या, डोक्यात घातला फ्लॉवरपॉट

Last Updated : Dec 18, 2019, 1:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details