महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - पालघरमधील 103 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात - पालघर कोरोना न्यूज अपडेट

कोरोनाची लागण झालेल्या एका 103 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. शामराव इंगळे असे या 103 वर्षांच्या आजोबांचे नाव असून, डॉक्टरांचे उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

पालघरमधील 103 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
पालघरमधील 103 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

By

Published : May 8, 2021, 7:18 PM IST

पालघर -कोरोनाची लागण झालेल्या एका 103 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. शामराव इंगळे असे या 103 वर्षांच्या आजोबांचे नाव असून, डॉक्टरांचे उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

पालघरमधील विरेंद्रनगर येथील शामराव इंगळे या 103 वर्षांच्या आजोबाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाती कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे उपचार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

पालघरमधील 103 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

जिल्हाधिकाऱ्यांकडून आजोबांचे अभिनंदन

कोरोनावर मात केलेल्या या 103 वर्षांच्या आजोबांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. कोरोनाबाधित व्यक्तीने योग्य काळजी घेतल्यास, योग्य उपचार घेतल्यास तसेच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कोरोनावर मात करू शकतो हे या आजोबांनी दाखवू दिले आहे.

हेही वाचा -मुंबईत दोन कुटुंबांमध्ये फ्री स्टाईल मारामारी, बायाही उतरल्या मैदानात, बघा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details