पालघर : पालघरमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने रौद्र रूप धारण करून थैमान घातल्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत ( Disrupted Life due to heavy rains ) झाले आहे. अशातच मुंबई- बडोदा महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना अचानक वैतरणा नदीला ( Vaitrana River ) आलेल्या पुरात मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरचे १० कामगार अडकलेले ( 10 Workers Trapped in Flood Vaitrana ) होते. या सर्व कामगारांना एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. एनडीआरएफसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस यांचेसह जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कामगारांना वाचवण्यात यश आले.
सर्व कामगारांना काढले सुखरूप बाहेर : या घटनेची माहिती मिळतात एनडीआरएफचे पथक व पोलीस प्रशासन घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व त्यांनी वैतरणा नदीपात्रात अडकलेल्या दहा कामगारांची बोटीच्या साहाय्याने सुखरूप सुटका केली. सदरील कामगार 15 तास पुरात अडकले ( trapped in the flood for 15 hours ) होते. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व कामगारांना पुरातून सुखरूप बाहेर काढले.
एनडीआरएफच्या जवानांचे कौतुक : या कामगिरीबद्दल एनडीआरएफच्या जवान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस यांचे जिल्हा प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पालघरमध्ये आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघरमध्ये पावसाने हाहाकार घातल्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पालघर जिल्ह्याला हवामान खात्याचा इशारा : हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसादरम्यान मरिन ड्राईव्हवरही उधाणाची भरती-ओहोटी दिसून आली. आयएमडीने पालघर पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा यापूर्वी दिला आहे.