महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसर टिमा रुग्णालयातून कोरोनावर मात केलेल्या 10 जणांना डिस्चार्ज - palghar covid 19

टिमा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या या 10 जणांना तीन वर्षीय मुलीच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आज सर्वांनी कोरोनवर मात केली आहे.

10 covid 19 patient discharged from tima hospital boisar
बोईसर टिमा रुग्णालयातून कोरोनावर मात केलेल्या 10 जणांना डिस्चार्ज

By

Published : May 2, 2020, 7:34 PM IST

पालघर -बोईसर येथील टिमा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व उपस्थितांनी टाळ्या वाजवून कोरोनामुक्त झालेल्या या सर्वांचे अभिनंदन केले.

टिमा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या या 10 जणांना तीन वर्षीय मुलीच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आज कोरोनवर मात कोरोनवर मात केल्याचा आनंद या 10 डिस्चार्ज मिळालेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details