महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमधील दहाजण कोरोनामुक्त; जिल्हाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून केले अभिनंदन - पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 10 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. या 10 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बोईसर टिमा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदेंनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

पालघरमधील दहाजण कोरोनामुक्त
पालघरमधील दहाजण कोरोनामुक्त

By

Published : May 3, 2020, 8:47 AM IST

पालघर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 10 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. या 10 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बोईसर टिमा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व उपस्थितांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

पालघर ग्रामीणमध्ये एकूण 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे. तर, एका महिलेला आणि तीन वर्षीय मुलीलाही कोरोनामुक्त झाल्याने यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. सदर मुलीच्या संपर्कात आल्यामुळे काटाळे येथील 5, रानशेत येथील 4 तसेच उपजिल्हा रुग्णालय कासा येथील 2 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.

डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने एक प्रसुती झालेल्या मातेला कोरोनाची लागण झाली. यापैकी 10 रुग्णांचा 12 व्या व 13 व्या दिवशी घेण्यात आलेला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर बोईसरमधील टिमा रुग्णालयातील 9 व उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील 1 अशा एकूण 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details